![](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhLMwRHbZQbK3Ej4c8vdNaYVPTvJMSmhpEapx017yKMCBkSTZKXxCHUZl4RaTezBkKjnkfsK5lfZ0vp2kC1kTr2wCZuV7-Wuj4hmlfn8MBxgujlyJG3NA0chz2Z5w0uKVNNXbSGo9PRNLM/s320/Indira2.jpg)
इंदिरा गांधी (नोव्हेंबर १९,१९१७ - ऑक्टोबर ३१,१९८४) या भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान होत्या. बांग्लादेशच्या उभारणीवेळी त्यांची भूमिका आणि देशाला अणुशक्ती संपन्न बनविण्याचा त्यांचा निर्णय भारताला प्रगतीपथावर नेणारा होता.
लाल बहादूर शास्त्री यांच्या निधनानंतर पंतप्रधानपदाच्या लढाईवेळी त्यांना मोरारजी देसाई यांच्याशी सामाना करावा लागला. त्या १९६६ मध्ये देशाच्या पाचव्या पंतप्रधान (पहिल्या महिला पंतप्रधान) बनल्या. त्यांनी पोखरण येथे पहिली अणुचाचणी घडवून आणली.
इंदिराजींचा जन्म १९ नोव्हेंबर १९१७ रोजी अलाहाबाद येथे झाला. स्वातंत्र्य चळवळीत त्यांनी लहानपणापासूनच भाग घेतला. वयाच्या अवघ्या ११ व्या वर्षी त्यांनी काही स्वातंत्र्यसैनिकांच्या मदतीने अलाहाबादेतील मुलांची १९३० साली "वानर सेना' नावाची संघटना स्थापन केली. वयाच्या २१ व्या वर्षी त्यांनी राष्ट्रीय काँग्रेसमध्ये प्रवेश केला. १९५५ मध्ये त्या कॉंग्रेस कृती समितीच्या व सेंट्रल पार्लमेंटरी बोर्डाच्या सदस्य झाल्या. फेब्रुवारी १९५९ मध्ये त्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षा म्हणून निवडून आल्या. केंद्रीय मंत्रिमंडळात त्या १९६४ साली प्रथम रूजू झाल्या. तत्कालीन पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या मंत्रीमंडळात माहिती व नभोवाणीमंत्री म्हणून त्यांनी त्यावेळी कार्य केले. शास्त्रीजींचा ताश्कंद येथे १९६६ मधे मृत्यू झाल्यानंतर कॉंग्रेस अध्यक्ष कामराज यानी पाठिबा देउन ३५५ मतांनी मोरारजी देसाई यांचा पराभव करून त्या २४ जानेवारी १९६६ रोजी श्रीमती इंदिरा गांधी प्रधानमंत्री म्हणून विजयी झाल्या. १४ प्रमुख व्यापारी बॅंकांचे राष्ट्रीयीकरण आणि पोखरण येथे पहिली अणुचाचणी , ऑपरेशन ब्ल्यू स्टार या त्याच्या आयुष्यातल्या महत्त्वाच्या घटना होत्या.
१९७७ साली त्यानी देशात आणिबाणी लागू करण्याचा वादग्रस्त निर्णय घेतला. यामुळे १९८० पर्यंत त्या सत्तेतुन दुर राहिल्या. १९८० च्या निवडणुकांत जनतेने पुन्हा त्यांच्यावर विश्वास दाखवला. पण यावेळी त्यांना अशांत पंजाब चा सामना करावा लागला. ऑपरेशन ब्ल्यू स्टार चा निर्णय खलिस्तान चळवळीला आळा घालण्यासाठी घेतला. पण अखेर त्यामुळेच त्यांच्या २ सुरक्षारक्षांकडुन त्यांची हत्या झाली.
बालपण
जवाहरलाल आणि कमला या नेहरु दाम्पत्याचे इंदिरा गांधी हे एकमेव अपत्य होते. १९ नोव्हेंबर १९१७ ला इंदिरा चा जन्म झाला. मुळात नेहरु हे काश्मिरी पंडित होते. इंदिरांचे आजोबा मोतीलाल नेहरु व्यवसायाने वकील आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षावचे आघाडीचे नेते होते. भारताच्या राजकारणात त्यांना मानाचे स्थान होते. ते स्वरुप रांणी यांसोबत विवाह करून अलाहाबाद येथे स्थायिक झाले. जवाहरलाल नेहरु यांचे शिक्षण इंग्लंड मध्ये झाले, पुढे ते भारतीय स्वातंत्र्य लढ्यातले अतिशय लोकप्रिय, महत्त्वाचे व्यक्तिमत्व बनले. तसेच स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधानही बनले. इंदिरा गांधींचे बालपण आपल्या घराच्या स्वातंत्र्य लढ्याच्या संस्कारांतच झाले. पुढे त्यांनी लहान मुला, मुलींची वानरसेना चळवळ सुरु केली. निद्रशने , मौर्चे काढणे. बंदी घातलेल्या गोष्टींची वाहतुक याप्र्कारे यात आपले योगदान दिले.
१९३६ मध्ये कमला नेहरु यांचे दीर्घ आजाराने देहावसान झाले. यावेळी इंदिरा गांधींचे वय केवळ १८ होते. त्यांचे शिक्षणही सोमरविले कॉलेज , ऑक्सफर्ड विद्यापीठ् येथे झाले. याच दर्म्यान त्या लंडन स्थित इंडिया लीग च्या सदस्या झाल्या. १९४० च्या दशकात इंदिरा गांधींनी फुफ्फुसाच्या आजारातुन मुक्ती साठी काही काळ स्वित्झरलंड मध्ये व्यतित केला. याच दरम्यान जवाहरलाल यांनी इंदिरा गांधींना लिहलेली पत्रे प्रसिध्द आहेत. युरोपातल्या वास्तव्या दरम्यानच त्यांची ओळख फिरोज गांधी या
तरुणाशी झाली. ही ओळख नंतर प्रेमात बद्लुन अखेर त्यांनी विवाह केला. फिरोज गांधी हे मुळात धर्माने फारसी होते.
फिरोज गांधींसोबत विवाह
भारतात परतताच त्यांनी फिरोज गांधींसोबत विवाह करण्याचा निर्णय घेतला. इंदिरा गांधींनी इतक्यातच लग्न करु नये म्हणत जवाहरलाल नेहरु यांनी त्यास विरोध केला. पण इंदिरा ठाम होत्या व त्यांनी मार्च १९४२ मध्ये विवाह केला. फिरोज गांधीं सुद्धा राजकारणात सक्रिय होते. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे फिरोज व इंदिरा दोघे सदस्य होते. १९४२ च्या लढ्यात भाग घेतला म्हणुन दोघांना अटक झाली होती. फिरोज गांधीं हे स्वातंत्र्यानंतर उत्तरप्रदेशातुन संसदेवर निवडुन गेले. त्याना राजीव व संजय अशी दोन मुले झाली. प्ण त्यानंतर दोघात दुरावा येत गेला. दरम्यान च्या काळात फिरोज गांधींना ह्रुदय विकाराचा झटका आला. अखेर १९६० मध्ये फिरोज गांधींचा म्रुत्यु झाला.
राजकारणातला प्रवास
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष पद:
१९५९ मध्ये इंदिरा गांधींनी निवडनुकीत भाग घेतला. आणि त्या अध्यक्ष म्हणुन निवडुन आल्या.
माहिती व नभोवाणीमंत्री: जवाहरलाल नेहरूंच्या मृत्युनंतर लालबहादुर शास्त्री पंतप्रधान झाले. यात त्यांनी माहिती व नभोवाणीमंत्री हे पद सांभाळले. याचदरम्यान त्यावेळच्या मद्रास राज्यात हिंदीला राष्ट्रीय भाषा घोषित करण्याविरोधात दंगे उसळले होते. तेव्हा त्यांनी मद्रासला भेट दिली. सरकारी अधिकारी, सामाजिक नेते यांची भेट घेउन राग शांत करण्याचा प्रयत्न केला. १९६५ च्या भारतपाक युद्धादरम्यान त्या श्रीनगर च्या आसपास सुट्या व्यतीत करत होत्या. पाकिस्तानी सैन्य फार जवळ पोहोचले आहे असे संदेश भारतीय सैन्याकडुन मिळुनही त्यांनी जम्मु अथवा दिल्ली येथे जाण्यास नकार दिला. अशा प्रकारच्या धाडसी कामांमुळे त्यांची छबी निर्माण करण्यात त्या यशस्वी झाल्या.
पाक आक्रमण परतुन लावण्यात भारताला यश आले. १९६६ च्या जानेवारी महिन्यात तत्कालिन स्सोव्हियत संघात ताश्कंद येथे पाकिस्तानचे अयुब खान आणि लालबहादुर शास्त्री यात शांती समजोता झाला. पण त्यानंतर काही तासातच त्यांचे ह्रदविकाराच्या झटक्याने निधन झाले. यानंतर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस मध्ये पंतप्रधान पदासाठी स्पर्धा सुरु झाली. मोरारजी देसाई यांनी आपला अर्ज भरला. पण तत्कालिन काँग्रेस अध्यक्ष कामराज यांनी अंतर्गत राजकारणातून इंदिरा गांधी ना पाठिंबा दिला. ३५५ विरुद्ध १६९ मतांनी विजय मिळवला. त्या भारताच्या पाचव्या पंतप्रधान आणि पहिला महिला पंतप्रधान झाल्या.
पंतप्रधान
इंदिरा गांधी पंतप्रधान झाल्या तरी काँग्रेस मध्ये फुट पडली. राममनोहर लोहिया हे त्यांना गुंगी गुडिया म्हणुन संबोधायचे. अखेर १९६७ च्या निवडणुकात काँग्रेसचे ६० जागांचे नुकसान झाले. ५४५ पैकी २९७ जागांवर विजय मिळवुन सत्ता मिळाली. मोरारजी देसाई यांना उपपंतप्रधानपद आणि अर्थमंत्री पद द्यावे लागले. तरी अखेर १९६९ मध्ये मोरारजी सोबतच्या वादांनी काँग्रेसची २ शकले झाली. इतर पक्षांचा पाठिंबा मिळ्वुन त्यांनी सरकार वाचवले. जुलै १९६९ मध्येच त्यांनी बँकाचे राष्ट्रीयकरण केले.
No comments:
Post a Comment