Friday, February 25, 2011

पृथ्वीराज चव्हाण


पृथ्वीराज चव्हाण (१७ मार्च, इ.स. १९४६ - हयात) हे महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री आहेत. १० नोव्हेंबर, इ.स. २०१० रोजी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने त्यांची महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी नियुक्ती केली. त्यांनी ११ नोव्हेंबर इ.स. २०१० रोजी पदाची शपथ घेतील.

पृथ्वीराज चव्हाण हे राज्यसभेचे विद्यमान सदस्य आहेत.

जीवन

पृथ्वीराज चव्हाण यांचा जन्म इंदूरमध्ये झाला. राजकारणाचा वारसा त्यांना आपल्या मातापित्यांकडून लाभला. चव्हाणांनी बिट्स पिलानी येथून त्यांनी बी.ई. (ऑनर्स) ही पदवी मिळवली आणि त्यानंतर अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांत बर्कले येथील कॅलिफोर्निया विद्यापीठातून एम.एस. ही पदवी मिळवली. अमेरिकेत काही काळ काम केल्यानंतर ते भारतात परतले आणि त्यांनी राजकारणात प्रवेश केला.

केंद्रीय मंत्रिमंडळात राज्यमंत्री या नात्याने त्यांनी अनेक पदांचा कार्यभार पाहिला आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान, संसदीय व्यवहार आणि पंतप्रधान कार्यालय ही त्यापैकी प्रमुख खाती आहेत. काही महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय करारांमध्ये त्यांनी याकाळात महत्त्वाची भूमिका बजावली.

No comments:

Post a Comment