Monday, July 1, 2013

siddhu



Saturday, March 2, 2013

veer


Sunday, February 24, 2013

pic


Friday, October 5, 2012

MIFTA Cricket 2012 Singapore photos

MIFTA Cricket 2012 Singapore photos








marathi actor and actress at MIFTA 2012 Singapore photos


marathi actor and actress at MIFTA 2012 Singapore photos




Friday, February 25, 2011

पृथ्वीराज चव्हाण


पृथ्वीराज चव्हाण (१७ मार्च, इ.स. १९४६ - हयात) हे महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री आहेत. १० नोव्हेंबर, इ.स. २०१० रोजी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने त्यांची महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी नियुक्ती केली. त्यांनी ११ नोव्हेंबर इ.स. २०१० रोजी पदाची शपथ घेतील.

पृथ्वीराज चव्हाण हे राज्यसभेचे विद्यमान सदस्य आहेत.

जीवन

पृथ्वीराज चव्हाण यांचा जन्म इंदूरमध्ये झाला. राजकारणाचा वारसा त्यांना आपल्या मातापित्यांकडून लाभला. चव्हाणांनी बिट्स पिलानी येथून त्यांनी बी.ई. (ऑनर्स) ही पदवी मिळवली आणि त्यानंतर अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांत बर्कले येथील कॅलिफोर्निया विद्यापीठातून एम.एस. ही पदवी मिळवली. अमेरिकेत काही काळ काम केल्यानंतर ते भारतात परतले आणि त्यांनी राजकारणात प्रवेश केला.

केंद्रीय मंत्रिमंडळात राज्यमंत्री या नात्याने त्यांनी अनेक पदांचा कार्यभार पाहिला आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान, संसदीय व्यवहार आणि पंतप्रधान कार्यालय ही त्यापैकी प्रमुख खाती आहेत. काही महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय करारांमध्ये त्यांनी याकाळात महत्त्वाची भूमिका बजावली.

प्रतिभा पाटील

प्रतिभा देवीसिंह पाटील (१९ डिसेंबर, इ.स. १९३४ - हयात) या भारतीय प्रजासत्ताकाच्या १२ व्या राष्ट्रपती आहेत. माजी राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या कार्यकाळानंतर २५ जुलै, इ.स. २००७ रोजी त्यांनी राष्ट्रपतीपदाची जबाबदारी स्वीकारली. राष्ट्रपतीपदावर नेमल्या गेलेल्या त्या पहिल्या महिला आहेत.

राष्ट्रपतीपदापूर्वी त्या राजस्थानच्या १६व्या राज्यपाल होत्या. तत्पूर्वी त्या राज्यसभेच्या उपसभापती व इ.स. १९६२ ते इ.स. १९८५ दरम्यान महाराष्ट्राच्या विधानसभेत आमदार होत्या.

जीवन

भारताच्या विद्यमान राष्ट्राध्यक्षा आणि काँग्रेस पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या असणार्‍या श्रीमती प्रतिभाताई देवीसिह पाटील (शेखावत) यांचा जन्म १९ डिसेंबर १९३४ रोजी खानदेशातील जळगाव जिल्ह्यात झाला. घरची श्रीमंती त्यात पाच भावात एकच लाडकी बहीण त्यामुळे लहानपण लाडाकोडात गेलं. एम्. जे. कॉलेज, जळगाव येथून एम. ए. पदवी घेतल्यानंतर गव्हर्मेंट लॉ कॉलेज, मुंबई येथून एल. एल. बी. ची परीक्षा देऊन त्या कायदेतज्ज्ञ झाल्या.[१].

१९६२ साली त्या जळगाव विधानसभा मतदार संघातून निवडून आल्या. त्यांची एस. टी. महामंडळाच्या अध्यक्षा म्हणून नियुक्ती झाली. ७ जुलै १९६५ ला अमरावतीच्या शेखावतांच्या घरात प्रवेश केला. पहिल्यांदाच मंत्री झाल्या आणि सतत वीस वर्षे त्या निरनिराळ्या खात्याच्या मंत्री होत्या. आरोग्य, पर्यटन, संसदीय कार्य, गृहनिर्माण, समाजकल्याण व सांस्कृतिक, सार्वजनिक आरोग्य व समाजकल्याण, दारूबंदी व पुनर्वसन, शिक्षणमंत्री, विधान सभेवर फेरनिवड, विधान मंडळ नेतेपदी निवड १९७९ ते ८० या काळात विधानसभेत विरोधी पक्षनेत्या म्हणूनही त्यांनी काम पाहिले.

१९८५ साली राज्यसभेवर निवडून गेल्या व राज्यसभेच्या उपाध्यक्षा म्हणून निवडून आल्या. तो त्यांचा कार्यकाल संपल्यावर अमरावतीहून १९९१ साली प्रथमच त्या लोकसभा सदस्य म्हणून निवडून आल्या. १९८९ ला त्या मध्यप्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षाही होत्या. १९७८ ला एदलाबाद मतदार संघातून त्या काँग्रेस पक्षाच्या उमेदवार म्हणून निवडून आल्या.

नैरोबीत आंतरराष्ट्रीय समाजकल्याण परिषदेस भारत सरकारच्या प्रतिनिधी म्हणून त्या गेल्या होत्या.प्रिटोरिया येथील महिला परिषद, म्युनिक येथील महिलांची जागतिक परिषद तसेच १९८५ मध्ये दक्षिण अमेरिकेत बोलेव्हिया येथे झालेली परिषद अशा सर्व ठिकाणी त्यांनी देशाचे प्रतिनिधित्व केले.

महिला आर्थिक विकास महामंडळ स्थापून स्त्रियांना चरितार्थाच्या संधी उपलब्ध करून दिल्या. पाळणाघर मदत योजना स्थापन केली. महिला बँकांची स्थापना केली. आदिवासी विकास योजना,वसंतराव नाईक महामंडळ, अण्णाभाऊ साठे महामंडळ आणि ज्योतिबा फुले महामंडळ इ. महामंडळांची स्थापना केली. जळगाव येथे एक सुसज्ज रूग्णालय उपलब्ध करून दिले. अंधांसाठी संस्था काढून कार्य उभे केले. जळगाव येथे इंजिनियरींग कॉलेज काढले.


स्वीकारलेली पदे

* १९६२ पासून महाराष्ट्राच्या आमदार
* १९६७ ते ७२ : आरोग्य, पर्यटन, गृहनिर्माण, संसदीय कामकाज या खात्यांच्या राज्यमंत्री
* १९७२ ते ७४ : समाजकल्याण मंत्री
* १९७४ ते ७५ : आरोग्य आणि समाजकल्याण मंत्री
* १९७५ ते ७८ : शिक्षण, सांस्कृतिक, पुनर्वसन मंत्री
* १९७९ ते फेबुवारी १९८० : विधानसभेत विरोधी पक्षनेत्या
* १९८२ ते ८५ : शहरविकास आणि गृहनिर्माण मंत्री
* १९८३ ते ८५ : नागरी पुरवठा आणि समाजकल्याण मंत्री
* १९८५ ते ९० : राज्यसभेवर निवड
* १९८८ ते ९० : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीच्या अध्यक्ष
* १८ नोव्हेंबर १९८६ ते ५ नोव्हंेबर १९८८ : राज्यसभेच्या उपसभापती
* १९९१ : लोकसभेच्या खासदार
* ८ नोव्हेंबर २००४ : राजस्थानच्या राज्यपाल

कौटुंबिक पार्श्वभूमी

१९६५ मध्ये डॉ. देवीसिंग शेखावत यांच्याशी विवाह. एक मुलगा आणि एक मुलगी. प्रतिभा पाटील एक उत्तम टेबलटेनिस खेळाडू होत्या. त्यांनी राजकारणात येण्यापूर्वी कायद्याचा अभ्यास केला होता.

विवाद

राष्ट्रपतीपदासाठी नामांकन झाल्यापासून प्रतिभा पाटील यांच्याविषयी बरेच विवादास्प्द मुद्दे उघडकीस आले. त्यांच्या उमेदवारीचा अर्ज करण्याच्या एक दिवस आधी जळगावमधील काँग्रेसच्या मयत कार्यकर्त्याच्या पत्नी रजनी पाटील यांनी असा आरोप केला की प्रतीभा पाटीलांनी राजकीय स्थानचा फायदा घेऊन त्यांचे भाऊ जी. एन. पाटील यांना पतीच्या खून प्रकरणातून वाचवले. त्यानंतर अनेक वृत्तवाहिन्या आणि वर्तमानपत्रांनी त्यांच्या कुटुंबाशी निगडीत प्रतिभा महिला सहकारी बँक या संस्थेतील आर्थिक गैरव्यवहार (भारतीय रिझर्व बँकेने रद्द केलेला परवाना आणि पाटील कुटुंबीय चालवत असलेल्या साखर कारखान्यांकडून झालेली कर्जबुडी इत्यादि) उघडकीस आणले.

हे विवाद रजनी पाटील यांनी तत्कालीन राष्ट्रपती अब्दुल कलाम व सोनिया गांधी यांना लिहलेली पत्रे, बँकेच्या कर्मचारी संघटनेने लिहलेली पत्रे, न्यायलयीन निकाल, भारतीय रिझर्व बँकेचे अहवाल आणि महाराष्ट्रातील विधानसभेतील नोंदी यांच्या आधारे उघडकीस आणले गेले.